Advertisement

सामान्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून 'रेरा' कायदा लागू - प्रकाश मेहता


सामान्यांना हक्काचं घर मिळावं म्हणून 'रेरा' कायदा लागू - प्रकाश मेहता
SHARES

ग्राहकांना रिअल इस्टेट रेम्युलेशन अॅक्ट (रेरा) कायद्याबद्दल अधिकाअधिक माहिती मिळावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन रविवारी घाटकोपरमध्ये केले होते. सामान्य माणसाला आपल्या हक्काचे घर मिळावे, या प्रमुख उद्देशामुळे 'रेरा' कायदा लागू केला आहे. पूर्वी विकासकांच्या मुजोरीमुळे ग्राहकांचे प्रचंड नुकसान झाले. पण आता 'रेरा' कायद्यामुळे ग्राहकांचे नुकसान होणार नाही असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यक्त केला. प्रत्येक विकासकाने 1 जुलैपर्यंत त्यांच्या प्रकल्पाची नोंद 'रेरा'मध्ये करणे बंधनकारक असून नोंद न केल्यास विकासकाला दंड भरावा लागणार असल्याचे प्रकाश मेहता यांनी सांगितले.विकासक आणि ग्राहक या दोघांनमध्ये ताळमेळ घालणारा हा कायदा आहे. ग्राहकांच्या मनात विकासकाबद्दल विश्वास वाटावा म्हणून या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे 'महारेरा'चे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी सांगितले.

वेस्टन इंडिया रिजनल काऊन्सिल आणि इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंन्टट ऑफ इंडिया यांच्या वतीने घाटकोपर (पू.) येथील भाटीयावाडी येथे रविवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा