Advertisement

भाज्यांचे दर कडाडले, गृहिणींचं बजेट कोलमडलं

कांदा १०० रुपये प्रतिकिलोवर झाला आहे. कांद्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी येणार हे नक्की...

भाज्यांचे दर कडाडले, गृहिणींचं बजेट कोलमडलं
SHARES

मुंबईच्या बाजारपेठेत (Mumbai Market) भाजीपाल्याचे दर (Vegetable Prices) प्रचंड वाढल्याने सर्व सामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. सध्या कोथींबीरची एक जूडी ३०-४० रुपयांना विकली जात आहे. तर कांद्याने सर्वांचाचं वांदा करून ठेवला आहे. कांदा १०० रुपये प्रतिकिलोवर झाला आहे. कांद्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी येणार हे नक्की...

ऐन दिवाळीच्या तोंडावर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्व सामान्यांमध्ये नाराजी आहे. राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस पडल्याने भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. कांदा, बटाटा, डाळी, कडधान्यानंतर आता सर्व भाजीपाल्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. हिरवी मिरची, बटाटा, वांगी, कारली, दोडका, बिन्स, कोबी, फ्लॉवर, गवार, आदी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपली आवडत्या चविष्ठ भाज्यांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीतदेखील मोठी वाढ होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा २५ मेट्रिक टनांवरून १५०० मेट्रिक टन करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचाः- ९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा