Advertisement

९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय

सलामीवीर इशान किशनचं अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं दिल्ली कॅपिटल्स विरोधात विजय मिळवला आहे.

९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय
SHARES

सलामीवीर इशान किशनचं अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं दिल्ली कॅपिटल्स विरोधात विजय मिळवला आहे. ९ गडी राखून विजय मिळवला असून, प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईनं दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने (mumbai indians) आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. किशन आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली.

नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेत (ipl 2020) आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दिल्लीच्या संघाला विजयाची आवश्यकता होती. परंतू मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर पहिल्या षटकापासून दिल्लीच्या फलंदाजांनी मान टाकायला सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने धवनचा झेल घेतला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या जागेवर संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ देखील अपयशी ठरला, बोल्टच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वी १० धावा काढून बाद झाला.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, चहरनं आपल्या लेगस्पिनच्या जाळ्यात दिल्लीच्या कर्णधाराला अडकवत संघाला मोठं यश मिळवून दिलं. यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. बुमराह, चहर, बोल्ट, कुल्टर-नाईल यांनी एकामागोमाग एक दिल्लीला धक्के देणं सुरु ठेवलं. स्टॉयनिस, ऋषभ पंत, हर्षल पटेल, शेमरॉन हेटमायर यांनीही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट फेकल्या.

१११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असताना डी-कॉक बाद झाला. परंतू यानंतर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत इशान किशनने नाबाद ७२ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत किशनने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३-३ तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी १-१ बळी घेतला.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा