सलग १६ व्या दिवशीही दरवाढ, पेट्रोल १६ पैशांनी महागलं


SHARE

मुंबईसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग १६ व्या दिवशीही वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी महागलं. त्यामुळे मुंबईतल्या ग्राहकांना प्रति लीटर पेट्रोलसाठी ८६.२४ रु. तर डिझेलसाठी ७३.७९ रु मोजावे लागत आहे.


सरकारकडून फक्त आश्वासन

कर्नाटक निवडणुकीनंतर १३ मे पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा परिणाम जिवनाश्यक वस्तूंवरही होत आहे. त्याचा फटका सर्वसमान्यांना बसत आहे. मात्र जनतेला सरकारकडून फक्त आश्वासनच दिली जात आहेत.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सर्वसामान्यांना लवकरच महागाईपासून दिलासा देईल, असं म्हणत त्यांनी अजून एक आश्वासन दिलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या