Advertisement

स्कॉर्पिअन क्लासची आयएनएस कलवरी नौदलात दाखल


स्कॉर्पिअन क्लासची आयएनएस कलवरी नौदलात दाखल
SHARES

भारतीय बनावटीची अत्याधुनिक स्कॉर्पिअन वर्गातील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी अखेर भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस कलवरी या पाणबुडीचं लोकार्पण केलं. यावेळी आयएनएस कलवरीला देशाच्या स्वाधीन करताना पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि फ्रांस या दोन्ही देशातील नात्यांची प्रशंसा केली.




कोण होते उपस्थित?

मुंबईच्या माझगाव डॉकमध्येपार पडलेल्या आयएनएस कलवरीच्या लोकार्पण कार्यक्रमाला रक्षा मंत्री निर्मला सितारमण, नौदल प्रमुख सुनिल लांबा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


शत्रूचा अचुक वेध घेण्याची क्षमता

फ्रांसच्या सहकार्याने मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये आयएनएस कलवरी बांधण्यात आली आहे. स्कोर्पिअन जातीच्या या पाणबुड्या अतिशय अद्यायावत आहे. शत्रूचा अचुक वेध घेण्याची क्षमता या पाणबुडीच्या गाईडेड क्षेपणास्त्रामध्ये आहे. आयएनएस कलवरी ६७.५ मीटर लांब असून १२.३ मीटर ऊंच आहे. याआधी १९ जुलै २००० रोजी आयएनएस सिंधुराष्ट्र ही पाणबुडी नौदलात सामील झाली होती. 


याचेही परिक्षण सुरू

१ मे २०१६ रोजी आयएनएस कलवरीचं जलावतरण करण्यात आलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर अखेर १४ डिसेंबरला आयएनएस कलवरी नौदलात दाखल झाली. स्कोर्पिअन वर्गातील दुसरी पाणबुडी आयएनएस खंडेरीचं सध्या परीक्षण सुरू असून लवकरच ती देखील नौदलात दाखल होईल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा