रुग्ण, डॉक्टरांच्या नात्यासाठी सुसंवाद अभियान

Nagpada
रुग्ण, डॉक्टरांच्या नात्यासाठी सुसंवाद अभियान
रुग्ण, डॉक्टरांच्या नात्यासाठी सुसंवाद अभियान
See all
मुंबई  -  

रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यातला दुरावा कमी होऊन ते आणखी घट्ट व्हावे यासाठी सुसंवाद अभियान या कार्यक्रमाचं उद्धाटन मुंबईतील सर. जे. जे. रुग्णालयात करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टरांनी रुग्णांना कशी वागणूक द्यावी यावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सर. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने उपस्थित होते. रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात अनेक कारणांवरून भांडण होतात. पुढे या भांडणाचे रुपांतर मारामारीत होते. हा प्रसंग कधीच कुठल्या डॉक्टरवर येऊ नये म्हणून हा सुसंवाद अभियान कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी निवासी डॉक्टरांनी रुग्णाला हाताळताना होणाऱ्या अनेक शंका उपस्थित केल्या. डॉक्टरांच्या शंकेचे निरसन करण्यासाठी डॉ. संदिप माने यांना नेमण्यात आले होते.

डॉक्टरांनी नेहमीच संवेदनशील असले पाहिजे. डॉक्टरांनी अनेक प्रसंगाला सामंजस्याने सोडवले पाहिजे. डॉक्टरांनी रुग्णांना चांगली वागणून दिली पाहिजे.
- तात्याराव लहाने, अधिष्ठाता, सर. जे. जे. रुग्णालय समूह

या कार्यक्रमाला जर निवासी डॉक्टरांनी चांगला प्रतिसाद दिला तर, नक्कीच भविष्यात सर्व रुग्णालयांत हा कार्यक्रम राबवणार. डॉक्टरांनी खरेच रुग्णांशी चांगले वागावे आणि आपल्याला दिलेले काम हे त्या-त्या वेळी करून द्यावे. म्हणजे डॉक्टरांना त्यांची जबाबदारी कळालीच पाहिजे.

- डॉ. प्रवीण शिंगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.