Advertisement

गणरायाचे प्रत्यक्ष मंडपात दर्शन घेण्यावर प्रतिबंध; महापालिकेची नवी नियमावली


गणरायाचे प्रत्यक्ष मंडपात दर्शन घेण्यावर प्रतिबंध; महापालिकेची नवी नियमावली
SHARES

सार्वजनिक गणेशोत्सवावर यंदा करोनाचे सावट असल्याने राज्य सरकारनं अत्यंत साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेनं आपल्या गणेशोत्सवाबाबतच्या नियमावलीत सुधारणा केली आहे. त्यानुसार यावेळी लोकांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात प्रत्यक्ष जाऊन श्रीगणेशाचे दर्शन घेण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे.

लोकांनी सार्वजनिक मंडळांच्या बाप्पांचे ऑनलाइन दर्शन घ्यावे अशी सूचना महापालिकेने मुंबईकर गणेशभक्तांना केली आहे. मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जून महिन्यात नियमावली जाहीर केली होती. त्यात सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी मास्कचा वापर करून शारीरिक अंतर पाळणे, तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत सूचना केल्या होत्या.

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत महापालिकनं या नियमात सुधारणा करून बाप्पाचे प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध घातला आहे. यासाठी महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळानी गणेशभक्तांना पूजेसाठी पास वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर महापालिकेने नवा नियम जाहीर केला.

मुंबई महापालिकेची नवी नियमावली

  • महापालिकेच्या नव्या नियमावली नुसार कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी खालील नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.
  • कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्र घेतलेल्या केवळ १० स्वयंसेवकांना बाप्पाचे आगमन आणि विसर्जन करण्याची परवानगी असेल.
  • या स्वयंसेवकांनी लशीची दुसरी मात्र घेऊन १५ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेला असावा.
  • घरगुती बाप्पाचे आगमन आणि विसर्जनासाठी फक्त कुटुबातील पाच लोकांना परवानगी असेल.
  • या ५ लोकांनी देखील करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असल्या पाहिजेत. 
  • दुसरी मात्रा घेऊन त्यांचा १५ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असायला हवा.
  • विसर्जनापूर्वी बाप्पाची मूर्ती कलेक्शन सेंटर, कृत्रिम तलाव किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळी विसर्जनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवावी लागणार आहे.
  • लोकांना बाप्पाच्या विसर्जनाची परवानगी देण्यात आलेली नाही. 
  • महापालिकेनं विसर्जनासाठी शहरातील २४ वॉर्डात १७३ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे.
  • विसर्जन स्थळावर जाण्यास मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.
  • विसर्जनासाठी नेत असताना बाप्पाचे वाहन रस्त्यात दर्शनासाठी थांबवण्यास प्रतिबंध असणार आहे.
  • एखाद्या इमारतीतील किंवा वस्तीमधील गणेशमूर्ती एकाच विसर्जन स्थळी नेण्यात येणार नाही.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा