Advertisement

राणीच्या बागेसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ११५ कोटी रुपयांची तरतूद

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) प्राणांच्या सुरक्षेसाठी व अनेक नवनवीन सुविधा देण्याकरीता त्याचे आधुनिकीकरण केलं जात आहे.

राणीच्या बागेसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ११५ कोटी रुपयांची तरतूद
SHARES

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) प्राणांच्या सुरक्षेसाठी व अनेक नवनवीन सुविधा देण्याकरीता त्याचे आधुनिकीकरण केलं जात आहे. या कामांसाठी महापालिकेच्या २०२२-२३च्या अर्थसंकल्पात ११५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मुंबई पालिकेकडून राणी बागेसाठी विविध उपक्रम, योजना आखल्या जात आहेत.

आधुनिकीकरण प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यात पाणमांजर, सांबर, भेकर, नीलगाय, चौशिंगा या वन्यजीवांसाठीचे प्रदर्शनीय बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने १३ फेब्रुवारी, २०१९ मध्ये मंजूर केलेल्या आराखड्यानुसार राणी बागेत विविध आधुनिकीकरण प्रकल्पांची कामे टप्प्याटप्प्यात केली जात आहेत.

त्यासाठी पालिकेच्या २०२०-२१ अर्थसंकल्पात दुसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी ४३ कोटी रुपये खर्च झाला असून २०२२-२३च्या पालिका अर्थसंकल्पात ११५.४६ कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे.

राणी बागेच्या आधुनिकीकरण प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्यात पाणमांजर, सांबर, भेकर, नीलगाय, चौशिंगा या वन्यजीवांसाठीचे प्रदर्शनीय बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यासह नवीन संकल्प उद्यान विकसित करण्यात आले आहे.

प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात प्राणिसंग्रहालयालगतच्या सुमारे १० एकर इतक्या दोन भूखंडांवर विस्तार केला जाणार आहे. त्यात, जिराफ, झेब्रा, पांढरा सिंह, जॅग्वार (मार्जार कुळातील प्राणी) आदी प्राण्यांसाठी प्रदर्शनी तयार करण्यात येत आहेत. त्यातील निविदा प्रक्रिया काम अंतिम टप्प्यात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा