Advertisement

ठाण्यात रंगला वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम


ठाण्यात रंगला वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम
SHARES

तरूण पिढीतील वाहनचालकांना वाहतुकीबाबत शिस्त लागावी, त्यांना वाहतुकीचे नियम, चिन्हांचं महत्त्व समजावं, त्याचं त्यांनी तंतोतंत पालन कसं करावं यासाठी ठाणे पोलिसांमार्फत वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणं यंदाही विविध शाळा व कॉलेजांत हा कार्यक्रम रंगणार अाहे. तरूण पिढीला वाहतूक सुरक्षा व त्याची नियमावली याची माहिती व्हावी हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. स्पर्धाचं आयोजन 

 या जनजागृती कार्यक्रमात वाहतुकीचं महत्त्व पटवून देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर पेंटिग, रांगोळी स्पर्धा, ग्रुप डान्स, पथ नाट्य अादी विविध स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं होतं. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे कॉलेज अादी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला . या स्पर्धेचा निकाल २० डिसेंबर रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये जाहीर केला जाणार अाहे.  


वाहतुकीचे धडे

विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम कोणते, त्यांचं पालन कसं करावं, वाहतुकीची चिन्हे कोणती, परिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी, तेथील वाहनांची तपासणी, किती वयापर्यंत कोणते वाहन चालवावे याबाबतचे धडे ठाणे वाहतूक पोलिस मधुकर पांड्ये आणि अमित काळे यांनी विद्यार्थ्यांना दिले. 
हेही वाचा - 

मुंबईत अनधिकृत बांधकामांचं पेव! ३२ महिन्यांत ७६,४९१ तक्रारी

लोकशाहीविरूद्ध लढण्याचा धडा देणारी वेबसाईट ब्लाॅक
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा