लोकशाहीविरूद्ध लढण्याचा धडा देणारी वेबसाईट ब्लाॅक

या वेबसाईटवर लोकशाहीविरोधात कसा लढा द्यावा, अशा गोष्टींची माहिती काही देशांच्या उदाहरणासहीत देण्यात आली होती. त्यामुळे ही वेबसाईट देशातील लोकशाहीसाठी घातक असल्याचा निष्कर्ष काढत सरकारने ही वेबसाईट मंगळवारपासून बंद केल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसकडून देण्यात आली.

लोकशाहीविरूद्ध लढण्याचा धडा देणारी वेबसाईट ब्लाॅक
SHARES

भारत सरकारकडून Bannedthought.net ही वेबसाईट मंगळवारी ब्लाॅक करण्यात आली. या वेबसाईटवरून नक्षलवादाला प्रोत्साहन देणारी माहिती प्रसारीत होत असल्याने ही वेबसाईट बंद करत असल्याचं कारण सरकारकडून प्रसिद्ध पत्रक काढून देण्यात आलं आहे.


शहरी नक्षलवादाकडे लक्ष

भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर राज्यात पहिल्यांदाच शहरी भागांत नक्षली हिंसाचाराचे आरोप झाले. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी नक्षलवादी आणि माओवाद्यांशी संबध असलेल्याच्या संशयावरून काही जणांना अटक देखील केली.


चौकशीत निष्पण्ण

त्यांच्या चौकशीतून काही महत्वाची पत्रे, डेटा रेकाॅर्ड पोलिसांच्या हाती आला. शहरीभागात जातीपातीचं राजकारण करून सोशल मीडियाद्वारे नागरिकांची माथी भडकवण्याचा कट या मंडळींनी आखल्याचा दावा पोलिसांनी केला. एवढ्यावरच न थांबता देशातील सत्ता उलथवण्यासाठी पंतप्रधानांच्या हत्येचा कट आखल्याचा उल्लेख त्यांच्या पत्रात आढळून आल्यानंतर तपास यंत्रणांनी शहरी नक्षलवादाकडे लक्ष केंद्रीत केलं.


लोकशाविरोधात लढा

त्यातून Bannedthought.net या वेबसाईटवरून शहरातील तरूणांची माथी भडकवण्याचं काम सुरू असल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं. या वेबसाईटवर लोकशाहीविरोधात कसा लढा द्यावा, अशा गोष्टींची माहिती काही देशांच्या उदाहरणासहीत देण्यात आली होती. त्यामुळे ही वेबसाईट देशातील लोकशाहीसाठी घातक असल्याचा निष्कर्ष काढत सरकारने ही वेबसाईट मंगळवारपासून बंद केल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसकडून देण्यात आली.



हेही वाचा-

नक्षलवादी कनेक्शन: फरेरा आणि गोन्साल्वीस यांना अटक

नक्षली पत्रात काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांचा फोन नंबर



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा