नक्षलवादी कनेक्शन: फरेरा आणि गोन्साल्वीस यांना अटक

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून या दोघांना काही दिवसांपूर्वी नजरकैदत ठेवण्यात आलं होतं. या दोघांचा जामीन अर्ज शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

नक्षलवादी कनेक्शन: फरेरा आणि गोन्साल्वीस यांना अटक
SHARES

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयवरून अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्वीस या दोघांना पुणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. व्हर्नन यांना अंधेरीतून, तर फरेराला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून या दोघांना काही दिवसांपूर्वी नजरकैदत ठेवण्यात आलं होतं. या दोघांचा जामीन अर्ज शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.


नजरकैदेत ठेवण्याचे आदेश

अरुण फरेरा, व्हर्नन गोन्साल्वीस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरवरा राव यांना २८ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. भीमा कोरेगाव दंगल पेटवण्यामागे त्यांचा हात असल्याचं पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. मात्र, या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानानंतर २६ ऑक्टोबरपर्यंत या तिघांसहीत आणखी २ आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.


जामीन अर्ज फेटाळला

या आरोपींना पुणे न्यायलयाकडे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र शुक्रवारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी सायंकाळी गोन्साल्वीस यांना अंधेरीच्या राहत्या घरातून तर फरेराला ठाण्यातून अटक केली.

गौतम नवलखा यांच्यावर ठेवण्यात आलेली नजरकैद उठवण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने १ ऑक्टोबर रोजी दिला होता. तर वरवरा राव यांनी पुणे पोलिसांच्या या कारवाईला हैदराबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तिथं या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.



हेही वाचा-

नक्षलवादी कनेक्शन: राज्य सरकारला झटका, आरोपपत्र दाखल करण्याची मुदतवाढ रद्द!

नक्षलवाद कनेक्शन प्रकरणी 'ते' पाच जण महिनाभर नजरकैदेत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा