Advertisement

डिसेंबरमध्ये 'या' दिवशी मुंबईकरांना सुट्टी जाहीर

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.

डिसेंबरमध्ये 'या' दिवशी मुंबईकरांना सुट्टी जाहीर
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरमधील चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी मुंबई महानगरपालिकेबरोबरच राज्य शासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या सोयीसुविधांचा आढावा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. हेलिकॉप्टरमधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात यावे, विविध रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष उभारण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. 

बेस्टकडून विशेष बस सेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत 15 ते 20 मिनिटांच्या वारंवारतेने बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

मध्यरात्रीनंतर 12 विशेष लोकल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी गुरुवारी मध्यरात्री परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत.

  • मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील कुर्ता-परळ विशेष लोकल कुर्ला येथून गुरुवारी रात्री 12.45 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 1.05 वाजता पोहचेल.
  • कल्याण-परळ लोकल कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 2.15 वाजता पोहोचेल.
  • ठाणे-परळ विशेष लोकल ठाणे येथून रात्री 2.10 वाजता सुटेल आणि परळ येथे रात्री 2.55 वाजता पोहोचेल.
  • परळ-ठाणे लोकल परळ येथून रात्री 1.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे रात्री 1.55 वाजता पोहोचेल.
  • परळ-कल्याण विशेष लोकल परळ येथून रात्री 2.25 वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री 3.40 वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर विशेष लोकल

हार्बर मार्गावरील वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री 1.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 2.10 वाजता पोहोचेल. पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेल येथून रात्री 1.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 2.45 वाजता पोहोचेल. वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशी येथून रात्री 3.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे रात्री 3.40 वाजता पोहोचेल. कुर्ता-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून रात्री 2.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे रात्री 3.00 वाजता पोहोचेल.



हेही वाचा

महापरिनिर्वाण दिन : 5 अनारक्षित विशेष गाड्या धावणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाबाहेरील 'या' मार्गात बदल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा