उद्घाटन न केल्यामुळे सार्वजनिक शौचालय दोन वर्षांपासून बंद


  • उद्घाटन न केल्यामुळे सार्वजनिक शौचालय दोन वर्षांपासून बंद
  • उद्घाटन न केल्यामुळे सार्वजनिक शौचालय दोन वर्षांपासून बंद
SHARE

मालाड (प.) येथील अंबुजवाडीतल्या शौचालयाचे उद्घाटन न झाल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून शौचालय कुलूपबंद आहे. 2014 मध्ये तेथील आमदार असलम शेख यांच्या निधीतून लाखो रुपये खर्चून हे शौचालय बांधण्यात आले. पण अजूनही या शौचालयाला टाळे लागलेले आहे. हे शौचालय लवकरच सुरू करणार असल्याचे तेथील स्थानिक नगरसेविका संगीता सुतार यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मालाड (प.) अंबुजवाडीत आमदार असलम शेख यांच्या निधीतून 2014 मध्ये हे शौचालय बांधण्यात आले. पण दोन वर्ष उलटल्यानंतरही प्रवाशांना या शौचालयाचा वापर करता येत नाही. शौचालयाचे उद्घाटनच झाले नसल्यानेच या शौचालयाला टाळे लागले आहे, असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.

यासंदर्भात पी उत्तर विभाग समितीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता हे शौचालय म्हाडाच्या निधीतून बांधण्यात आले आहे, त्याबद्दल तेच सांगू शकतील असे म्हणत अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या