Advertisement

अाणि राहुल गांधींनी मराठीतून व्यक्त केला शोक!


अाणि राहुल गांधींनी मराठीतून व्यक्त केला शोक!
SHARES

कोणतीही घटना असो, तत्परतेनं ट्विट करणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या फार मोठी अाहे. गुरुवारी रात्री कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण अागीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीत ट्विट करून शोक व्यक्त केला. अापल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी यांनी प्रथमच मराठीतून ट्विट करत सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का दिला.



गुरुवारी मध्यरात्री कमला मिल कपांऊंडमधील वन अबाव्ह पबला अाग लागल्यानंतर त्यात अातापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ पेक्षा अधिक जण जखमी झाले अाहेत. युवासेनेचे अध्यक्ष अादित्य ठाकरे असो वा मुंबई भाजपचे अध्यक्ष अाशिष शेलार, किंवा शिक्षणमंत्री विनोद तावडे, किंवा काँग्रेसचे अामदार नितेश राणे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी इंग्रजीमधून ट्विट केलं अाहे. पण राहुल गांधींनी मराठीतून ट्विट करत पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून या घटनेची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा