SHARE

मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानकावर अस्वच्छ पाण्यात लिंबू सरबत बनवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टिका झाल्याने रेल्वे प्रशासन आता स्थानकावरील स्टाॅलवर थंडगार शितपेय विकण्यावर बंदी घालण्याच्या पवित्र्यात आहे. 


व्हिडिओ व्हायरल

कुर्लाच्या फलाट क्रमांक ७ वर असलेल्या कँटीनमध्ये २५ मार्च रोजी  कँटीनचा कर्मचारी पोटमाळ्यावरील टाकीतील भांडी धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यातून लिंबू सरबत बनवत होता. ही बाब रेल्वेच्या प्रवाशी ब्रिजवरून प्रवास करताना एका सतर्क प्रवाशाने पाहिली. त्याने हा प्रकार  त्याच्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ त्या प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला टॅग करून ट्विटरवर टाकला. त्यानंतर काही तासात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्याने रेल्वे प्रशासनावर सर्वच स्तरावरून टिकेची झोड उठली. 


एफडीएमार्फत चौकशी

त्यानंतर रेल्वे प्रशासनाने काही तासात या कँटीनला ताळे ठोकले. तसंच घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेशही दिले. याशिवाय कँटीनमध्ये बनवण्यात येणारं खाद्यपदार्थ व पाण्याची एफडीएमार्फत चौकशी करण्याचेे आदेेेश ही दिल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी पत्रकारांना दिली.


लेखी आदेश

घडलेला हा प्रकार रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकावरील स्टाॅलवर शीतपेय विक्री करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात येणार आहे. तसे लेखी आदेशच सर्व स्टाॅल धारकांना रेल्वेने दिला आहे. त्यामुळे लवकरच रेल्वे स्थानकावरून थंड शीतपेय  हद्दपार होणार आहेत. मात्र कंपनीद्वारा विकण्यात येणाऱ्या शितपेयांंवर बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे.


स्टाॅल चालकावर गुन्हा

या घटनेची गंभीर दखल घेत वडाळा रेल्वे पोलिसांनी स्टाॅल चालक मोहम्मद आलम अन्सारी (४५), आणि कर्मचारी छांगा मुजुवा (५६) या दोघांवर २७३,३४ नुसार अदखलपाञ गुन्ह्यांची नोंद केली आहे. मात्र या प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करण्याची कायद्यात तरतूद नसल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करण्यास मिळावी या करता न्यायालयाकडून परवानगी घेतली आहे.  त्यामुळे रेल्वेकडून कलिना वैद्यकिय न्यायवैधक प्रयोग शाळेतून येणाऱ्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वडाळा रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी दिली.


कँटीनची तोडफोड

 स्टेशनवरील फलाट क्रमांक ७ वरील याच कँटीनची  २ एप्रिल २०१७ रोजी प्रवाशांनी तोडफोड केली होती. या कँटीनमधून एका दिव्यांग प्रवाशानं समोसा विकत घेतला. मात्र त्याला समोसामध्ये केस दिसला. हे जेव्हा त्याने कँटिनमध्ये बसलेल्या मुलाला सांगितले तेव्हा त्या मुलाने या दिव्यांग प्रवाशाला अपशब्द वापरले. यावेळी आजूबाजूला असलेले प्रवासी या दिव्यांगाच्या मदतीला आले आणि त्यांनी रागात कँटिनची तोडफोड केेेेली.हेही वाचा - 

हार्बर रेल्वेमध्ये पुन्हा स्टंटबाजी, दोघांना अटक

प्रेमप्रकरणाची माहिती घरी देण्याची धमकी देऊन अत्याचार
संबंधित विषय
ताज्या बातम्या