प्रेमप्रकरणाची माहिती घरी देण्याची धमकी देऊन अत्याचार

तरुणीने सांगितल्याप्रमाणे न केल्यास घरातल्यांना तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती देऊन बदनामी करण्याची धमकी प्रथमेशने दिली. त्याच्या दबावाला बळी पडलेल्या तरूणीवर प्रथमेशने एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत अत्याचार केले.

SHARE

प्रियकराची माहिती घरी सांगण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे.  प्रथमेश शिर्के असं या आरोपीचं नाव आहे.


शरीरसुखाची मागणी

गोराई परिसरात राहणाऱ्या तरुणीचा प्रथमेश हा मित्र होता. प्रथमेशला तरुणीच्या घराताल सर्व जण ओळखायचे. तरुणीचे एका तरुणाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती प्रथमेशला मिळाली. मात्र तरुणीच्या घरातल्याचा सुरूवातीपासूनच प्रेम विवाहाला विरोध होता. तरुणीने तिच्या प्रियकराबाबत घरात कोणतीही माहिती न दिल्याने प्रथमेशने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला तो तरुणीला त्रास देत होता. त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला.


बदनामीची धमकी

तरुणीने सांगितल्याप्रमाणे न केल्यास घरातल्यांना तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती देऊन बदनामी करण्याची धमकी प्रथमेशने दिली. त्याच्या दबावाला बळी पडलेल्या तरूणीवर प्रथमेशने एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत अत्याचार केले. रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने ही बाब तिच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तरुणीने बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रथमेश विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.हेही वाचा -

अंबानींना १७ कोटींचा चुना; कंपनीच्या माजी संचालकाला अटक

शिवसेनेकडून पुन्हा किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोधसंबंधित विषय
ताज्या बातम्या