अंबानींना १७ कोटींचा चुना; कंपनीच्या माजी संचालकाला अटक

शहा बेपत्ता झाल्याने रिलायन्स समूहाच्या वरिष्ठांना संशय आला. त्यानंतर कंपनीने केलेल्या चौकशीत घराची डागडुजी न करता शहा यांनी १७ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचं उघडकीस आलं.

अंबानींना १७ कोटींचा चुना; कंपनीच्या माजी संचालकाला अटक
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या इशा बिल्डटेक व इशा इन्फ्राटेक या कंपन्यांचे माजी संचालक मुकेश शहा (५७) यांनी समूहाची १७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांंनी शहा यांना शनिवारी तर त्यांची प्रेयसी मेहबुबा खान (५६) हिला मंगळवारी अटक केली.


हरवल्याची तक्रार

शहा १९८८ मध्ये रिलायन्स समूहामध्ये इशा बिल्डटेकच्या संचालकपदी रुजू झाले. २०१२ मध्ये इशा इन्फ्राटेकची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. शहा घाटकोपरमध्ये पत्नीसोबत राहतात. शहा यांनी अंबानी कुटुंबीय त्यावेळी राहत असलेल्या इमारतीच्या डागडुजीच्या नावाखाली १७ कोटींचा अपहार केला. त्यानंतर त्यांनी अचानक राजीनामा दिला. सप्टेंबर २०१८ मध्ये शहा मीरा रोड येथे प्रेयसीच्या घरी ओळख लपवून राहू लागले. पत्नीने ते हरवल्याची तक्रार घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.


प्रेयसीसाठी अपहार

 शहा बेपत्ता झाल्याने रिलायन्स समूहाच्या वरिष्ठांना संशय आला. त्यानंतर कंपनीने केलेल्या चौकशीत घराची डागडुजी न करता शहा यांनी १७ कोटी रुपयांची अफरातफर केल्याचं उघडकीस आलं. कंपनीने या प्रकरणी कफ परेड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपासाअंती शनिवारी शहा यांना अटक केली. चौकशीत प्रेयसीवर पैसे खर्च करण्यासाठी अपहार केल्याची कबुली शहा यांनी दिली. शहा तिच्याकडेच ओळख लपवून राहत असल्याने मंगळवारी प्रेयसीलाही अटक झाली. तिच्या घरातून ७५ लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.



हेही वाचा -

बोगस कॉलसेंटर प्रकरणी फरार अभिनेत्रीला अटक

व्याजदराच्या आमिषाने वकिलाला २४ लाखांना गंडा




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा