Advertisement

शिवसेनेकडून पुन्हा किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध

मंगळवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर शिवसेना-भाजप यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेनं उत्‍तर-पूर्व मुंबईतील सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

शिवसेनेकडून पुन्हा किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध
SHARES

लोकसभा निवडणुकीला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तसंच, या लोकसभा निवडणुकीसाठी शिनसेना-भाजप यांची यूती झाली आहे. मात्र, तरीही भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. मंगळवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर शिवसेना-भाजप यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेनं  उत्‍तर-पूर्व मुंबईतील सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. 


सोमय्यांचा प्रचार करणार नाही

'लोकसभा निवडणुकीसाठी भाजप किरीट सोमय्या यांना उमेदवारी देणार असेल, तर आम्ही प्रचार करणार नाही’, असं शिवसेनेनं पहिलाच भाजपाला सांगितलं होतं. तसंच, सोमय्या निवडणूक हारावेत यासाठी प्रयत्न करू. दरम्यान, भाजपनं मुंबईतील सर्व उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. परंतू, किरीट सोमय्या यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही. 


भ्रष्‍टाचाराच्या विरुद्ध मोहिम

दरम्यान, सोमय्या यांनी देशात भ्रष्‍टाचाराच्या विरुद्ध मोहिम राबवली होती. त्याशिवाय महाराष्‍ट्रातील अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यात त्यांचा सहभाग होता. तसंच, किरीट सोमय्या खासदार होण्यापुर्वी आमदार सुद्धा होते. मात्र, शिवसेनेसोबतचे त्यांचे संबध चांगले नसल्यानं त्यांच्या नावाची घोषणा अद्याप भाजपनं केली नाही आहे.



हेही वाचा -

कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला मिळणार उत्तर मुंबईतील उमेदवारी?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा