Advertisement

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीतून रेल्वेची ३ कोटींची कमाई

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून रेल्वेनं तब्बल ३ कोटी ८ लाख रूपयांची कमाई केली आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीतून रेल्वेची ३ कोटींची कमाई
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याच लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनदरम्यान रेल्वे मंत्रालयानं प्रवासी वाहतूक बंद केली आहे. त्यामूळे रेल्वेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. असं असलं तरी रेल्वे प्रशासनाकडून या दिवसांत होणाऱ्या मालवाहतूकीवर भर देऊन हा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून रेल्वेनं तब्बल ३ कोटी ८ लाख रूपयांची कमाई केली आहे. 

पश्चिम रेल्वेनं सर्वाधिक कमाई केली आहे. यामध्ये १ कोटी ५९ लाखांचा वाटा पश्चिम रेल्वेचा आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत पश्चिम रेल्वे देशातील सर्व रेल्वे विभागातून अव्वल ठरली आहे.  रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी विशेष मालगाडी, पार्सल गाड्या सुरु केल्या. ८ ते १७ एप्रीलदरम्यान रेल्वेनं देशभरातील पार्सल गाड्यांची वाहतूक करून ३ कोटी ८ लाख रुपयाचं उत्पन्न मिळवलं. 

सध्या रेल्वे मार्गावर फक्त मालगाडी आणि पार्सल गाडी धावत आहे. याद्वारे देशभरात नागरिकांना दुध, धान्य, इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत ३० लाख १७ हजार टन जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करण्यासाठी १ हजार ७२१ माल डबे वापरण्यात आले आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा