Advertisement

रेल्वे कर्मचाऱ्यांना व्हर्च्यूअल रियालिटी द्वारे प्रशिक्षण

मुंबईच्या लोकल गाड्यांच्या देखभालीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीत बदल केला जात आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना व्हर्च्यूअल रियालिटी द्वारे प्रशिक्षण
SHARES

भारतीय रेल्वे (Indian Railway) 3  फेब्रुवारी 1925  रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (csmt) आणि कुर्ला (kurla) दरम्यानच्या पहिल्या विद्युत रेल्वे प्रवासाची 100 वर्षे साजरे करत आहे. या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कुर्ला येथील जुने कार शेड 100 वर्षे जुने आहे.

या कारशेड मध्ये मुंबईच्या (mumbai) लोकल गाड्यांच्या देखभालीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीत बदल केला जात आहे.

1925 मध्ये बांधलेले कुर्ला कार शेड हे कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या पश्चिम बाजूला आहे. त्यात सुमारे 500 ते 600 कर्मचारी आहेत. हे कर्मचारी 70 ते 75 लोकल गाड्यांच्या देखभालीसाठी तीन शिफ्टमध्ये काम करतात.

हे कामगार गरज आणि वेळापत्रकानुसार 3 दिवस ते 18 महिन्यांत रेकचे नियमित ओव्हरहॉलिंग करतात. तसेच आता अधिक रॅक सामावून घेण्यासाठी कार शेडची क्षमता वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

या वर्षी जानेवारीमध्ये खरेदी केलेली व्हीआर म्हणजेच व्हर्च्युअल रियालिटीवर आधारित प्रशिक्षण प्रणाली कारशेडच्या परिसरातील प्रयोगशाळेत स्थापित करण्यात आली आहे. त्यात एक मोठी स्क्रीन, एक हेडसेट, एक हँडहेल्ड कंट्रोलर, हातमोजे आणि इतर उपकरणे आहेत.

सध्या, रेल्वे अधिकारी आणि अभियंते लोकल ट्रेनच्या विविध घटकांच्या तपशीलांसह सिस्टम कॉन्फिगर करत आहेत. बोगी, चाके आणि स्प्रिंग्जची माहिती सिस्टममध्ये भरण्यात आली आहे. तर सीट्स, दरवाजे, खिडक्या, दिवे, पंखे, छप्पर आणि पेंटोग्राफची माहिती योग्य वेळी जोडली जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

“आम्ही व्हीआर-आधारित मॉड्यूलचे काम पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहोत जो लोकल ट्रेनमधील सर्वात लहान घटकांपासून ते सर्वात मोठ्या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जाईल,” असे प्रयोगशाळेतील एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.

कार शेडमधील एका जुन्या बॅरेकचे प्रशिक्षण केंद्रात नूतनीकरण केले जात आहे. त्यात चार वर्गखोल्या असतील. प्रत्येक खोलीत 40 ते 60 प्रशिक्षणार्थी सामावतील. तसेच VR आधारित प्रशिक्षण प्रणालीने त्या सुसज्ज असतील.



हेही वाचा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाघाटीच्या 3 पिल्लांचे आगमन

फेरीवाल्यांसाठी डोमिसाईल आवश्यक आहे का? कोर्टाने पालिकेला ठणकावले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा