पूर्व उपनगरांत पावसाची हजेरी

मुंबईतील पूर्व उपनगरातील चेंबूर, कुर्ला, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड परिसरात बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. चार वाजता सुरू झालेल्या पावसाने अर्धा तास झोडपले. त्यामुळे काही दिवसांपासून उन्हाचा त्रास सहन करावा लागण्याऱ्या मुंबईकरांना थोडा का होईना, पण गारव्याचा सुखद अनुभव घेता आला. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची धांदल उडाली. छत्र्या जवळ नसल्यामुळे लोकांना भिजत घरी जावे लागले. तर दुसरीकडे बच्चे कंपनीने मात्र या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.

Loading Comments