Advertisement

मुंबईतून पाऊस गायब; ०.० पावसाची नोंद

मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने बऱ्यापैकी दांडी मारली आहे.

मुंबईतून पाऊस गायब; ०.० पावसाची नोंद
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानं (mumbai rains) हजेरी लावली होती. परंतू, त्यानंतर पावसानं मुंबईत दांडी मारली असून, त्यामुळं मुंबईकरांना उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने बऱ्यापैकी दांडी मारली आहे. कुठेतरी आलेली एक सर किंचित कोसळत असून, नंतर मात्र मुंबईचे आकाश मोकळे होत आहे.

गेल्या २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही वेधशाळांमध्ये चक्क ०.० अशा पावसाची नोंद झाली. दरम्यान, अशा वातावरणातही येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरीदेखील पडझड मात्र कायम आहे.

२८ जुलै रोजी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास सांताक्रूझ येथील शेलार चाळीत तळमजला अधिक एक मजला असलेल्या राहत्या घराच्या भिंतीचा काही कोसळून ३ जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांवर व्ही.एन. देसाई रुग्णालयाचार करत त्यांना सोडण्यात आले. तर एका जखमीस मात्र के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे एकूण ५ ठिकाणी झाडे कोसळली असून, यात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.

मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात मुंबईची तुबंई झाली. सखल भगांत गुडघाभर पाणी साचल्यानं रस्ते व रेल्वे वाहतूक विसक्ळीत झाली. परिणामी चाकरमान्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला. मात्र, सध्या पाऊस येऊन-जाऊन असल्यानं उकाडा प्रचंड वाढला आहे. हेही वाचा -

महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार

२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा