Advertisement

राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात रंगला 'टेनिस'चा सामना


राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात रंगला 'टेनिस'चा सामना
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात शिवाजी पार्क जिमखाना इथं टेनिस खेळतानाचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज ठाकरे यांची कला आणि क्रीडाबाबतची आवड तर सर्वांच्या परिचयाची आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी हल्ली नियमितपणे टेनिस खेळायला सुरुवात केली आहे.

शिवाजी पार्क जिमखान्यात रोज संध्याकाळी राज टेनिस खेळण्यासाठी जातात. मात्र त्यांच्यासोबत पुत्र अमित ठाकरे यांनीही त्यांना साथ देत टेनिसचा आनंद लुटला आहे. राज ठाकरे आणि अमित यांच्यात तब्बल २ तास सामना रंगला.

पिता- पुत्रामध्ये रंगलेल्या या टेनिस सामनाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. कोरोनाच्या काळात राज ठाकरे त्यांच्या आरोग्याबाबत फार काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्क येथील टेनिस कोर्टवर ते रोज खेळायला देखील जात आहेत. यासाठी त्यांनी प्रशिक्षकही नेमला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा