Advertisement

कंन्टेंमेंट झोनमध्ये राहणाऱ्या भावाला देखील राखी पोहोचणार, पोस्टाचा पुढाकार

यावर्षी अनेक भावंडाना एकत्र येऊन रक्षाबंधन साजरा करता येणार नाही. पण पोस्ट ऑफिसनं पुढाकार घेतला आहे.

कंन्टेंमेंट झोनमध्ये राहणाऱ्या भावाला देखील राखी पोहोचणार, पोस्टाचा पुढाकार
SHARES

कोरोनामुळे रक्षाबंधनाच्या सणाला घरातून बाहेर पडता येणार नाही. पडायचं म्हटलं तरी ते धोकादायक ठरू शकतं. पण चिंता नसावी, कारण तुमची राखी तुमच्या भावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पोस्ट खात्यानं उचलली आहे. 

यावर्षी अनेक भावंडाना एकत्र येऊन रक्षाबंधन साजरा करता येणार नाही. पण पोस्टानं अनेक बहीणींनी आपली राखी भावापर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाऊसुद्धा पोस्टानं आपल्या बहिणीला गिफ्ट द्यायचा प्लॅन करत आहे. त्यामुळे पोस्टानेसुद्धा रक्षाबंधनासाठी विशेष तयारी केली आहे.

२५ जुलैपासूनच रक्षाबंधनाच्या कामाला पोस्ट ऑफिसेस लागले असून आठवड्याभरात प्रत्येकाच्या राख्या, भेटवस्तू पोस्टमन घरोघरी जाऊन पोहचवणार आहेत. पोस्टानं यंदाच्या वर्षी रक्षाबंधनासाठी खास एन्व्हलप तयार केलं आहे. त्यातून राखी पाठवता येऊ शकते. रक्षाबंधनाच्या या इन्व्हलपसाठी वेगळा डेस्क पोस्ट कार्यालयात केला आहे.

बहीण, भाऊ कोरोनाच्या या संसर्गामध्ये कंन्टेन्मेंट झोनमध्ये जरी राहत असतील तरी त्यांच्या पत्त्यावर वेळेत राखी, भेटवस्तू पाठवण्याची जबाबदारी पोस्टानं आणि पोस्टमननं घेतली आहे. यावर्षी रक्षाबंधनाला सुद्धा चांगला प्रतिसाद पोस्ट कार्यालयामध्ये पाहायला मिळतोय.

3 ऑगस्टला रक्षाबंधन असताना पोस्टात आलेल्या सगळ्या राख्या, भेटवस्तू रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत किंवा एक-दोन दिवस आधी पोहचणं गरजेचं आहे. त्यासाठी येणाऱ्या रविवारीसुद्धा पोस्टमन या राख्या, भेटवस्तू घरोघरी पोहचवण्याच्या कर्तव्यावर असणार आहेत. या संकटाच्या काळातही भावा-बहिणीचा प्रेम पोहचवण्याचं काम पोस्टमन करणार आहेत.
संबंधित विषय
Advertisement