Advertisement

मनोरुग्णांसोबत रक्षाबंधन साजरा


मनोरुग्णांसोबत रक्षाबंधन साजरा
SHARES

मनोरुग्णांना आपुलकीची जाणीव व्हावी या भावनेने प्रणव आधार एनजीओने ठाण्याच्या मनोरुग्णालयात रक्षाबंधन साजरा करण्यात आला. या रुग्णालयातील मनोरुग्णांना राखी बांधून त्यांना फळवाटप करण्यात आले. ठाण्याच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक मानले जाणारे प्रादेशिक मनोरुग्णालय गेल्या एक शतकाहून अधिक काळ शहराच्या वेशीवर कार्यरत आहे. 

महाराष्ट्रातील चार शासकीय मनोरुग्णालयांपैकी एक असलेल्या या रुग्णालयात मुंबई, रायगड, पालघर, धुळे, जळगाव येथून रुग्ण येतात. 1901 मध्ये या मनोरुग्णालयाची स्थापना झाली आहे. येथे साधारणत: दर दिवशी सरासरी 1550 रुग्णांवर उपचार होत असतात. अशा या ऐतिहासिक रुग्णालयातप्रणव आधार एनजीओने रक्षाबंधन साजरा केला.
ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. संस्थेच्या सचिव वैशाली शिंदे यांच्यासह शीतल मुकणे, यशोदा पुरणकर, रेखा घायवट आदी महिलांनी 300 मनोरुग्ण बांधवांना राख्या बांधल्या.


मनोरुग्णांविषयी समाजातील बहुतांशजणांना अनेक गैरसमज आहेत. या मनोरुग्णांना त्यांच्या नातेवाईकांव्यतिरिक्त कोणीही भेटत नाही. त्यांना आपुलकीची जाणीव व्हावी या भावनेने प्रणव आधार एनजीओने हा उपक्रम राबवला. भविष्यात देखील आम्ही त्यांच्यासोबत इतर सण देखील साजरे करू.
प्रकाश शिंदे, अध्यक्ष, प्रणव आधार एनजीओ


हेही वाचा -

वाडियातल्या बच्चेकंपनीने पोलिसांना बांधल्या राख्या!


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा