तुमच्या 'ब्रो'साठी ट्रेंडी आणि स्टायलिश राख्या!

Mumbai
तुमच्या 'ब्रो'साठी ट्रेंडी आणि स्टायलिश राख्या!
तुमच्या 'ब्रो'साठी ट्रेंडी आणि स्टायलिश राख्या!
तुमच्या 'ब्रो'साठी ट्रेंडी आणि स्टायलिश राख्या!
तुमच्या 'ब्रो'साठी ट्रेंडी आणि स्टायलिश राख्या!
तुमच्या 'ब्रो'साठी ट्रेंडी आणि स्टायलिश राख्या!
See all
मुंबई  -  

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने यंदाही बाजारपेठा विविध प्रकारच्या राख्यांनी सजल्या आहेत. पारंपरिक गोंड्याच्या राखीला यंदा मोती, शंख-शिपल्यांची कलाकुसर करून हटके टच दिलेला दिसतो. रंगीबेरंगी बोंडाच्या राख्याही दिसायला आकर्षक आहेत. बोंडाच्या राख्या, कार्टून कॅरेक्टरच्या राख्या, रुद्राक्ष आणि मोती डिझाइनच्या राख्यांनाही विशेष मागणी आहे. या राख्यांचा बोलबाला तर दरवर्षी असतोच. पण यावर्षी होऊन जाऊदे काही तरी हटके! 


चॉकलेट राखी

तुम्ही कधी 'चॉकलेट राखी' ट्राय केली आहे का? चॉकलेटची राखी ही काय भानगड आहे? असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल.. पण सांताक्रुझला राहणाऱ्या अपेक्षा भागवतने यावर्षी चॉकलेट राखीची भन्नाट कल्पना आणली आहे!यावर्षी रक्षाबंधनाला काही तरी हटके करावे म्हणून तिला ही चॉकलेट राखीची कल्पना सुचली. व्हॅनिला आणि चॉकलेट या फ्लेवर्समध्ये या राख्या आहेत. बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या रंगात या राख्या अपेक्षाने बनवल्या आहेत. फक्त ४० ते ५० रूपयांमध्ये या राख्या उपलब्ध आहेत. चॉकलेट १५-२० दिवस आरामात टिकते. त्यामुळे फक्त रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून नंतर ती तुम्हाला खाता येऊ शकते किंवा तुम्ही फ्रिजमध्येही ठेवू शकता. या राखीचे पॅकिंग सुद्धा अपेक्षाने सुंदर केले आहे.दोन वर्षांपूर्वी अपेक्षाने चॉकलेट बनवायचा व्यवसाय सुरू केला. यावर्षी तिने पहिल्यांदाच 'चॉकलेट राखी' ही कल्पना अंमलात आणली आहे. तिच्या 'राखी चॉकलेट'ला चांगला प्रतिसादही मिळत आहे. तुम्हालाही चॉकलेट राखी ऑर्डर करायची असेल तर तिच्या चॉकलेट कनेक्शन या फेसबुक पेजला नक्की भेट द्या


क्विलिंग पेपर राखी

तुमच्या 'ब्रो'साठी सर्वात वेगळी आणि सुंदर राखी घ्यायची असेल, तर आणखी एक पर्याय आहे आणि तो म्हणजे क्विलिंग पेपरचा. फुले, पाकळ्या, वेली, पक्षी, कानातले-गळ्यातले, तर कधी ग्रीटिंग तर कधी वॉलपीसवरची नक्षी असे बरेच काही बनवता येते, तेही क्विलिंग पेपरने. क्विलिंगची कलाकुसर ही प्रत्येकालाच भुरळ घालते. म्हणूनच ही कला शिकण्याचा मोह वसईत राहणारे रोहीत आणि स्वाती साडविलकर यांनाही आवरता आला नाही.या दोघांनी क्विलिंग पेपरचा वापर करून सुंदर आणि नाजूक राख्या बनवल्या आहेत. पेपरच्या पातळ पट्ट्या करून, त्या गुंडाळून त्याला सुंदर आकार देऊन केलेल्या या राख्या सुरेख दिसतात. पण या राख्या बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. क्विलिंग पेपर नाजूक असल्याने त्यांच्यापासून राख्या बनवणे हे आव्हानात्मक आहे.रोहीत आणि स्वातीने पहिल्यांदाच क्विलिंग पेपरपासून राख्या बनवल्या आहेत. यावर्षी या राख्या त्यांनी कुटुंबियांसाठी बनवल्या आहेत. पण पुढच्या वर्षी रक्षा बंधनाला या राख्या विकण्याचा मानस असल्याचे रोहीत साडविलकर यांनी सांगितले.     


लेदर राखी

आता तुम्हाला एक हटके, ट्रेंडी आणि स्टाईलिश राखी दाखवणार आहोत आणि ती म्हणजे लेदर राखी. लेदरची राखी? लेदर पर्स, जॅकेट, बूट्स पाहिलेत पण लेदरची राखी पण असते? तुम्ही जे ऐकलेत ते अगदी खरे आहे. वसईत राहणारे निलेश सचदेव यांना ही आइडियाची कल्पना सुचली. निलेश धारावीतून लेदर आणतात. ब्रेसलेटसारखा आकार देण्यासाठी धारावीतच लेदरची कटिंग केली जातेफक्त ऐवढेच नाही, तर निलेश 'लेदर राखी'वर तुम्हाला हवे असलेले नावही कोरून देतो. जसे की, 'हँडसम ब्रो’, 'लवली ब्रो', 'जुगाडू भाई' अशी नावे प्रिंट केलेल्या लेदर राख्या उपलब्ध आहेत. २५० रुपयांपासून या राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. निलेश सचदेव स्टोअर Nilesh Sachdev Store या नावाचे त्यांचे फेसबुक पेज देखील आहे. गेल्या २-३ वर्षांपासून निलेश लेदर ब्रेसलेटचा बिझनेस करत आहेत. लेदर ब्रेसलेटपासूनच निलेशला लेदर राखीची कल्पना सुचली. गेल्या वर्षीपासून सुरू केलेल्या या संकल्पनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.  


मार्केटमध्ये असणाऱ्या टिपिकल राख्यांचा तुम्हाला कंटाळा आला आहे? तुम्हाला काही तरी नवीन आणि स्टायलिश ट्राय करायचे आहे? मग तुमच्यासाठीच बनल्या आहेत या राख्या. एकदा तरी या हटके राख्या ट्राय कराच!डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.