Advertisement

'रेशन दुकानदारांना पगार सुरू करा' धनंजय मुंडेंची मागणी


'रेशन दुकानदारांना पगार सुरू करा' धनंजय मुंडेंची मागणी
SHARES

राज्यातील स्वस्त धान्य देणाऱ्या रेशन दुकानदारांच्या मागण्या मांडून त्यांना तात्काळ पगार सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली.


याकडे सरकारचे लक्ष वेधलं

रेशन दुकानदार सोमवारपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसले असल्याने त्यांच्या मागण्यांवर चर्चा होण्यासाठी मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडून सरकारचे लक्ष वेधले. रेशन दुकानदारांच्या अडचणी समजून न घेतल्यामुळे त्यांना आंदोलन करावे लागले आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड रेशन कार्डला लिंक झालेले नाहीत. एपीएल, बीपीएल कार्ड धारकांची एंट्री सर्व्हर मध्ये झालेली नसल्यामुळे रेशन दुकानदारांसमोर अडचणी उभ्या राहिल्या असल्याचे मुंडे यांनी निदर्शनास आणले.


'यांच्या मागण्याकडे लक्ष द्या'

रेशन दुकानदार सरकारी यंत्रणेची अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहेत. मात्र सरकारने त्यांना थोडा वेळ दिला पाहीजे. बायोमेट्रिकसाठी लगेच सक्ती न करता थोडा वेळ द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. उद्या जर रेशन दुकानदार अधिक काळासाठी संपावर गेले तर बीपीएल, एपीएल धारकांना रेशन मिळण्याची पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या मागण्याकडे संवेदनशील भूमिकेतून बघावे, असे ते म्हणाले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला. विषय गंभीर असल्यामुळे इतर आयुधाखाली चर्चा उपस्थित करण्याचे निर्देश दिले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीही यासाठी संमती दर्शवली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा