Advertisement

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्णांसाठी संधी, 'इतक्या' जागांसाठी भरती

यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २ ऑगस्ट २०२१ पासून यासाठी अर्ज करता येणार आहे.

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्णांसाठी संधी, 'इतक्या' जागांसाठी भरती
SHARES

भारतीय नौदलात दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. नौदलात संगीतकार नाविक पदाच्या ३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २ ऑगस्ट २०२१ पासून यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट आहे.

एकूण जागा : ३३

पदाचे नाव: सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त उमेदवाराला संगीत विषयाचे चांगले ज्ञान असणे आणि सोबतच वाद्य वाजवता यायला हवे. 

वयोमर्यादा
उमेदवाराचा जन्म हा १ ऑक्टोबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००४ च्या दरम्यानचा असणे गरजेचे आहे.

वेतन
ट्रेनिंग दरम्यान उमेदवाराला १४ हजार ६०० रुपये स्टायपेंड दिला जाईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिफेन्स पे मॅट्रीक्स लेवल-३ अंतर्गत २१ हजार ७०० रुपयांपासून ६९ हजार १०० रुपयांपर्यंत पगार मिळेल. याशिवाय त्यांना एमएसपीच्या माध्यमातून ५ हजार २०० प्रति महिना प्लस डीए दिला जाईल.

शारीरिक पात्रता:
भारतीय नौदलात एमआर संगीतकार नाविकसाठी फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) देखील घेतली जाणार आहे. पीएफटीममध्ये ७ मिनिटात १.६ किलोमीटर धावावे लागणार आहे. यासोबतच १० पुशअपचा समावेश असेल. साधारण ३०० उमेदवारांना म्यूझिक टेस्ट आणि पीएफटीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात येईल. अधिक माहितीसाठी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : ६० रुपये/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2021

प्रवेशपत्र: सप्टेंबर 2021

परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.indiannavy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा