बेस्टच्या (BEST) विद्युत विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून रिक्त पदे भरण्याची (recruitment) प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. विद्युतपुरवठा विभागातील जोडारी सहाय्यक (जॉइंटरमेट) या पदासाठी बेस्ट उपक्रमाने कर्मचाऱ्यांकडूनच अर्ज मागवले आहेत.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाची आधीच दुर्दशा झालेली असताना आता विद्युतपुरवठा विभागही चर्चेत आला आहे. बेस्टचा विद्युतपुरवठा विभाग अद्याप नफ्यात आहे. मात्र विद्युत विभागातही मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत.
छापील बिले वितरित करण्यासाठी कर्मचारी नाहीत, मीटर रिडींगसाठी कर्मचारी नाहीत अशी परिस्थिती असल्यामुळे बेस्टचा विद्युतपुरवठा विभागही सध्या अडचणीत आहे.
त्यातच बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदावर कोणीही प्रशासकीय अधिकारी येण्यास तयार नाही. त्यामुळे बेस्ट उपक्रम सध्या रामभरोसे आहे.
सध्या बेस्टच्या कारभाराची तात्पुरती सूत्रे मुंबई (mumbai) महानगरपालिकेच्या (bmc) अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवली आहेत.
गेल्या आठवड्यात बेस्ट कामगार सेनेने जोशी यांची भेट घेऊन बेस्ट उपक्रमाच्या अडचणीचा पाढा वाचला. यावेळी परिवहन विभागाबरोबरच विद्युतपुरवठा विभागातील समस्यावरही चर्चा करण्यात आली.
बेस्ट उपक्रमातील विविध पदे रिक्त असल्यामुळे त्याचा ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. विद्युतपुरवठा विभागाचेही नुकसान होत असल्याचा मुद्दा कामगार सेनेच्या सदस्यांनी मांडला.
विद्युत विभागातील पदभरतीबाबत यापूर्वीच निर्णय झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे ही पदभरती लवकर सुरू करण्याचे आदेश जोशी यांनी बेस्टच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार बेस्ट प्रशासनाने आता भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्रधारक
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचे सामान्यज्ञान व प्रभुत्व आवश्यक
विद्युतपुरवठा विभागातील किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक
संबंधित कागदपत्रांसह 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज सादर करावेत उप संचालक कार्यालय, वीज विभाग, दुसरा मजला, शिवाजी नगर औद्योगिक वसाहत, मुंबई –400015
हेही वाचा