Advertisement

घरातील कचऱ्याचे परिसरातच होणार रिसायकल

मुंबईकरांच्या घरातील कचऱ्याचं आता त्यांच्याच परिसरात रिसायकल होणार आहे.

घरातील कचऱ्याचे परिसरातच होणार रिसायकल
SHARES

मुंबईकरांच्या घरातील कचऱ्याचं आता त्यांच्याच परिसरात रिसायकल होणार आहे. रहिवाशांच्या घरातून निघणारा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर न जाता त्याचे परिसरातच रिसायकलिंग करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. यासाठी मुंबई आणि पूर्व-पश्चिम उपनगरांत ३७ ठिकाणी रिसायकलिंग प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पात सुका कचरा आणि प्लास्टिक वेगवेगळं काढून त्याचं रिसायकलिंग केलं जाणार आहे.

४० टक्के खर्च

या प्रकल्पासाठी प्रत्येकी ५ हजार चौरस मीटर जागा महापालिका उपलब्ध करून देणार आहेत्याशिवाय कचरा व प्लास्टिक रिसायकल करण्यासाठी कंत्राटदाराला महापालिका ४० टक्के खर्च देणार आहे. मुंबईत दररोज सुमारे ५ लाख बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या विकल्या जात आहेतराज्य सरकारनं २३ जून २०१८ पासून मुंबईसह राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली. त्यानुसार, मुंबईत मागील २ वर्षांत ७६ हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून, दुकानदार व फेरीवाल्यांकडून ४ कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याचं समजतं.

अंमलबजावणी सुरू

दरम्यान, प्लास्टिकबंदी अंमलबजावणी सुरू असून घरातील कचऱ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या मोठ्या प्रमाणात डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळं त्यांची विल्हेवाट स्थानिक पातळीवरच लावण्यासाठी मुंबई आणि उपनगरांत ३७ ठिकाणी कचरा वर्गीकरण व रिसायकलिंग प्रकल्प उभारले जाणार आहेत. 

सध्यस्थितीत या प्रकल्पासाठी मुंबईतील कफ परेड येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी किती कंपन्या निविदा भरू शकतील याचा अंदाज घेण्यासाठी महापालिकेनं 'स्वारस्य अभिरूची' अर्ज मागवले आहेत.



हेही वाचा -

यंदा दसऱ्याला वाहन खरेदीत घट, महसुलातही मोठी घट

मुंबईत ऑक्टोबर हिटच्या झळा, कमाल तापमानात झाली 'इतकी' वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा