Advertisement

यंदा दसऱ्याला वाहन खरेदीत घट, महसुलातही मोठी घट


यंदा दसऱ्याला वाहन खरेदीत घट, महसुलातही मोठी घट
SHARES

यंदा वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीचा फटका वाहन खरेदीवर बसला आहे, दरवर्षीच्या तुलनेत यंदा दसऱ्याला मुंबई, ठाण्यात होणाऱ्या वाहन खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय घट झाली आहे. ठाणे आरटीओत एकाही वाहनाची नोंदणी झालेली नाही. दरवर्षी वाहन खरेदीला गुढीपाडवा, दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधला जातो.

ग्राहकांची मोठी गर्दी

या दिवशी गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते. मात्र, यंदा दुचाकी, चारचाकी खरेदीकडं मुंबईसह ठाण्यातील ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. मुंबईतील ताडदेव, वडाळा आणि उपनगरातील अंधेरी, बोरीवली आरटीओत मिळून केवळ २९८ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या दिवशी इथं ५८४ वाहनांची नोंदणी झाली होती.

महसुलातही मोठी घट


आरटीओ 
१८ ऑक्टोबर २०१८
८ ऑक्टोबर २०१९
ताडदेव
३३ लाख ३४ हजार १४१
१६ लाख १९ हजार ५८७
वडाळा
९६ लाख ३६ हजार १८५
९ लाख ७ हजार ४३४ 
अंधेरी
७४ लाख ३० हजार ३१८
१२ लाख ३८ हजार ४५९ 



हेही वाचा -

मागण्यांच्या पुर्ततेसाठी पुकारलेला बेस्ट कामगारांचा संप तूर्तास लांबणीवर

मुंबईकरांना ऑक्टोबर हिटची जाणीव, कमाल तापमानत वाढ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा