Advertisement

नवी मुंबईत मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका नवी मुंबई महापालिकेलाही बसला आहे. यंदा पालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.

नवी मुंबईत मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा
SHARES

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा मोठा फटका नवी मुंबई महापालिकेलाही बसला आहे. यंदा पालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षीच  मालमत्ता कराची निम्मीच वसुली झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने थकीत मालमत्ता करवसुलीसाठी राबविलेल्या अभय योजनेला मुदतवाढ दिली आहे. १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी असे दोन महिने 

अभय योजनेला मुदतवाढ दिल्याने  मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळाला आहे. अभय योजनेत दोन महिन्यांच्या कालावधीत थकबाकीदारांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकीत रक्कम आणि २५ टक्के दंडाची रक्कम भरल्यास ७५ टक्के दंडात्मक रक्कम माफ होणार आहे. ही रक्कम एकाच वेळी भरावी लागणार आहे.

अभय योजनेचा लाभ घेण्याकरिता महानगरपालिकेच्या वेबसाइटवर आणि सर्व आठ विभाग कार्यालये आणि संलग्न भरणा केंद्रांवर यासाठी अर्ज उपलब्ध केले जाणार आहेत.  अभय योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पालिकेकडून प्रचार, प्रसिद्धी केली जाणार आहे. अभय योजनेचा लाभ घेत थकबाकीदारांनी शहर विकासात आपले योगदान द्यावं, असं आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.  



हेही वाचा -

११ वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा