राज्यात तीन वर्षात धर्म बदलण्याच्या संख्येत तिप्पट वाढ

  Mumbai
  राज्यात तीन वर्षात धर्म बदलण्याच्या संख्येत तिप्पट वाढ
  मुंबई  -  

  राज्यात नाव आणि जन्म दिनांक तर बदलले जातातच पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात धर्मही बदलला जात आहे. मागील तीन वर्षांमध्ये धर्म बदलण्याची संख्या तीन पट वाढल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रतिदिन दोन व्यक्ती राज्यात धर्म बदलत असल्याची माहितीही राज्य सरकारकडून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिळवली आहे.

  कोणत्या धर्मातून धर्म परिवर्तन करण्यात आले आहे, यासंदर्भातही अनिल गलगली यांनी माहिती विचारली होती. मात्र ही माहिती राज्य सरकारच्या शासकीय मुद्रण, लेखनसाम्रगी आणि प्रकाशन संचालनालयाने गोपनीयतेच्या मुद्दयावरून दिली नाही. त्यामुळे कोणत्या धर्मामधून धर्म परिवर्तन झाले आहे, ही माहिती कळू शकले नाही.

  आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासकीय मुद्रण, लेखनसाम्रगी व प्रकाशन संचालनालयाकडे 3 वर्षांत धर्म बदलणाऱ्यांची माहिती मागितली होती. वर्ष 2014, वर्ष 2015 आणि वर्ष 2016 या तीन वर्षांची त्यांना माहिती देण्यात आली आहे. वर्ष 2014 मध्ये 247 लोकांनी धर्म बदलला तर 2015 साली ही संख्या 615 झाली. वर्ष 2016 मध्ये 797 पर्यंत पोहचली. यात अर्ज फेटाळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्ष 2014 मध्ये 33, वर्ष 2015 मध्ये 60 आणि वर्ष 2016 मध्ये 45 अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे धर्म बदलण्याच्या संख्येत 3 पटीने झालेली वाढ आश्चर्यजनक व चिंताजनकही आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.