Advertisement

नवी मुंबई विमानतळाचे डी.बी. पाटील नामांतर करा : प्रकल्पग्रस्त

नवी मुंबई विमानतळाला डी.बी. पाटील असे नामांतर करावे अशी सर्वपक्षीय कृषी समिती आणि आगरी-कोळी समाजाची मागणी आहे.

नवी मुंबई विमानतळाचे डी.बी. पाटील नामांतर करा : प्रकल्पग्रस्त
SHARES

नवी मुंबई (New Mumbai) विमानतळाला डी.बी. पाटील असे नामांतर करावे, अशी सर्वपक्षीय कृषी समिती आणि आगरी-कोळी समाजाची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वी घोषणा न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. 

नवी मुंबई विमानतळाचे नामकरण समाजवादी आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते डी.बी. पाटील (DB patil) यांच्या नावावर करण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीपुर्वी नामांतर न केल्यास सर्वपक्षीय कृषी समिती आणि आगरी-कोळी समाजाने सरकारला परिणामांचा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला विमानतळाला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव द्यायचे होते. प्रचंड आंदोलनानंतर विमानतळाला डी.बी. पाटील यांचे नाव देण्याचे ठरले. नव्या महायुतीने मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत ठराव मंजूर केला होता. त्यास राज्याच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देऊन केंद्र सरकारकडे पाठवले आहे.

तथापि, प्रकल्पग्रस्तांमध्ये केंद्र सरकारच्या हेतूबद्दल संशय वाढत आहे. कारण अजुनही याबाबत हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आगरी-कोळी समाज 24 जून रोजी पाटील यांची 11 वी पुण्यतिथी साजरी करण्याच्या तयारीत आहे. 

सर्वपक्षीय कृषी समितीने आता दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी आणि नागरी विमान मंत्री यांची भेट घेण्याचे ठरवले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील (Dashrath Patil) यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही या विषयावर पंतप्रधानांना पत्र लिहू. आम्ही नवे नागरी विमान वाहतूक मंत्री, किंजरापू राममोहन नायडू (Kinjrapu rammohan naydu) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (muralidhar mohol) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीलाही (Delhi) जाऊ.” 

पनवेलचे (Panvel) माजी उपमहापौर जगदीश गायकवाड (Jagdeesh gaikwad)म्हणाले, “कोकण परिसरात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त लोकसंख्या असलेले 25 विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाव न दिल्यास 95 गावांतील लोक नाराज होतील.

अटल सेतू पुलाच्या नावातही दुर्लक्ष केल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असल्याचा दाट संशय नेते भूषण पाटील (Bhushan Patil) यांनी व्यक्त केला आहे. “पंतप्रधान मोदींनी पाटील यांचे नावही उच्चारले नाही आणि सिंधिया यांनी वचनही दिले नाही. पाटील यांच्या नावाचे फलकही हटवण्यात आले. आम्हाला आमच्या नेत्याचा आणि समाजाचा आदर हवा आहे.” 

कोणताही पाठपुरावा करण्यास नकार देताना भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) म्हणाले, "विमानतळ तयार झाल्यानंतरच त्याचे नाव दिले जाऊ शकते, हे वारंवार निदर्शनास आणून दिले आहे." 

ठाकूर पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी लोकसभा प्रचारादरम्यान डी.बी. पाटील विमानतळावरून पहिले विमान उड्डाण करणार असल्याचा पुनरुच्चार केला होता. आम्हाला खात्री आहे की योग्य वेळी मंजुरी मिळेल.”हेही वाचा

मुंबई, ठाणे, नाशिककरांचे पाणी महागणार?

NNMC कडून पार्किंग समस्या सोडवण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण सुरू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा