पालिकेची थुकपट्टी ?

दहिसर - दहिसर पूर्व येथील राजश्री सिग्नल हायवेवरील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांची गणपती विसर्जनाच्या दिवशीच डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुन्हा या रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहे. चार दिवसातच या रस्त्यांवर पुन्हा खड्डे दिसत आहेत. पालिकेने केलेली रस्त्यांची डागडुजी तात्पुरती होती का? डागडुजीच्या कामाचा दर्जा योग्य होता का? तसंच ही डागडुजी म्हणजे कार्यक्षमतेचा फार्स होता का? असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून विचारले जाऊ लागलेत.

Loading Comments