खड्डे दुरुस्ती झाली डोकेदुखी

 Dadar
खड्डे दुरुस्ती झाली डोकेदुखी
खड्डे दुरुस्ती झाली डोकेदुखी
खड्डे दुरुस्ती झाली डोकेदुखी
खड्डे दुरुस्ती झाली डोकेदुखी
See all

माहिम- दादर - माटुंगा कला केंद्रासमोर असलेल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्त करण्यात आले. मात्र खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात आलेले डांबर आणि खडी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या फुटपाथवर तसंच ठेवलंय. तर त्याच रस्त्यावरील फुटपाथच्या डागडुजीसाठी पेव्हर ब्लॉक पालिकेकडून उखडण्यात आले आहेत. एककीडे रस्ते दुरुस्तीकरणाचा नुसता देखावा, त्यात फुटपाथ डागडुजीचा घाट. या दोन्ही प्रकारांवर इथल्या स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलीय. दिवाळीपर्यंत तरी हा फुटपाथ पालिकेनं दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आलीय.

Loading Comments