Advertisement

२०१९ मध्ये रस्ते अपघातात ४४७ लोकांचा जीव गेला

२०१५ ते २०१९ या कालावधीत रस्ते वाहतुकीतील मृत्यूंमध्ये घट झाल्याचं एकूणच विश्लेषणातून समोर आलं आहे.

२०१९ मध्ये रस्ते अपघातात ४४७ लोकांचा जीव गेला
SHARES

मुंबई ट्राफिक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रोपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी यांच्या साथीनं अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी प्रकाशित केली आहे. १८४ किलोमीटरपर्यंत परिघात होणाऱ्या अपघाती मृत्यूंची आकडेवारी यात आहे.

२०१५ ते २०१९ या कालावधीत रस्ते वाहतुकीतील मृत्यूंमध्ये घट झाल्याचं एकूणच विश्लेषणातून समोर आलं आहे. २०१९ मधील आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, शहरातील रस्ते अपघातांमुळे ४४७ लोकांचा मृत्यू झाला होता. २०१८ मधील आकडेवारीच्या तुलनेत ही ३% आणि २०१८ मधील आकडेवारीच्या तुलनेत ही ४७% इतकी घट झाली आहे.

आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, प्राणघातक अपघातातील सुमारे ९९% अपराधी पुरुष होते. तर बळी पडलेल्यांपैकी ८०% पुरुषही होते. २०१९ मध्ये या प्राणघातक अपघातांमध्ये सामील होणारे बहुतेक ड्रायव्हर्स २० ते २४ वर्षे वयोगटातील आहेत.

गेल्या वर्षी प्राणघातक अपघातांचे सर्वाधिक बळी ३० ते ५९ वर्षे वयोगटातील होते. आकडेवारीत नमूद केलं आहे की, २०१९ मध्ये होणाऱ्या मृत्यूंपैकी ९०% मृत्यू हे सायकलस्वार, मोटरसायकल चालक तसंच पादचारी होते. या तीन गटातील लोकांचांही रस्ते अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ८३% इतका सहभाग आहे.

“२०१५ २०१९ या कालावधीत रस्ते रहदारी मृत्यूमधील सतत होणारी घट ही मुंबईतील शहर अधिकारी आणि पोलिसांच्या मेहनतीचा प्रभावशाली दाखला आहे. परंतु, मुंबईत अद्यापही रस्त्यावरुन चालत जाणाऱ्यांना अधिक अपघाताचा धोका आहे, असं ईटल स्ट्रॅटेजीजच्या पब्लिक हेल्थ अ‍ॅन्ड प्रीव्हेंटिव्ह मेडिसिन कन्सल्टंट डॉ. सारा व्हाईटहेड यांनी म्हटलं.

घाटकोपर माहुल रोड आणि बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर सर्वाधिक मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, अमर महल आणि गोदरेज जंक्शनमधील भागात गेल्या वर्षी सर्वाधिक रस्ते अपघात झालेत. आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, गोदरेज जंक्शन इथं २०१७ ते २०१९ दरम्यान १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्याच काळात अमर महल जंक्शन इथं २८  जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेनं जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान यावर्षी रस्ते अपघातात झालेल्या दुर्घटनांविषयी आपला अहवाल स्वतंत्रपणे जाहीर केला. यावर्षी केवळ १७२ मृत्यूची नोंद झाली असल्याचं एजन्सीने उघड केलं आहे. या मृत्यूंपैकी जवळजवळ ४७% पादचारी होते.



हेही वाचा

मेट्रोच्या कॉरिडोर विस्तारासाठी MMRDA नं मागवले ७२ अतिरिक्त कोच

महापालिकेची सॅप प्रणाली बंद असल्यामुळं निविदा प्रक्रिया राबविणं अशक्य

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा