Advertisement

महापालिकेची सॅप प्रणाली बंद असल्यामुळं निविदा प्रक्रिया राबविणं अशक्य

महापालिकेतील 'सॅप' प्रणाली अद्ययावत करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आणि त्यासाठी १३ ते २३ नोव्हेंबर या काळात ही प्रणाली बंद ठेवण्यात आली.

महापालिकेची सॅप प्रणाली बंद असल्यामुळं निविदा प्रक्रिया राबविणं अशक्य
SHARES

मुंबई महापालिकेची सॅप प्रणाली अद्ययावत करण्यात येणार आहे. या कामासाठी सॅप प्रणाली २६ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. मात्र कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात रखडलेल्या प्रभागांतील छोट्या-मोठ्या कामांची निविदा प्रक्रिया 'सॅप' प्रणालीअभावी राबविणं अशक्य बनलं आहे. महापालिकेतील 'सॅप' प्रणाली अद्ययावत करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आणि त्यासाठी १३ ते २३ नोव्हेंबर या काळात ही प्रणाली बंद ठेवण्यात आली.

या काळात काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. ‘सॅप’ प्रणाली अद्ययावत करण्यासाठी आणखी ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रणाली बंद असली तरीही पाणीपट्टी, मालमत्ता कराचा भरणा, तसंच इमारत बांधकामासाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या सुविधेसाठी पालिकेकडून अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, निविदा प्रक्रिया, कामांचं कार्यादेश देणं, अधिदान करणं आदी कामं बंद आहेत.

लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं शिथिल झाल्यानंतर कंत्राटदार आणि कामगार गावावरून मुंबईत परतू लागले आहेत. त्यामुळं प्रभागांमधील छोट्या-मोठ्या कामांना गती मिळेल, अशी नगरसेवकांना अपेक्षा होती. मात्र ‘सॅप’ प्रणाली अद्ययावत करण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

काम पूर्ण न झाल्यानं आता ३ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, विविध कामांची निविदा प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळं कामं लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळं नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा