Advertisement

रिझर्व्ह बँकेकडून 'या' सहकारी बँकेचा परवाना रद्द

बँकेकडे पुरेसे नसलेले भांडवल आणि भविष्यातून उत्पन्न मिळविण्याची कमी संधी आहे. तसंच ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्याएवढी या बँकेची आर्थिक स्थिती नाही.

रिझर्व्ह बँकेकडून 'या' सहकारी बँकेचा परवाना रद्द
SHARES

रिझर्व्ह बँकेने लातूर जिल्ह्यात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेमध्ये रक्कम जमा करणे आणि पेमेंट करण्यावर देखील आरबीआयने निर्बंध आणले आहेत.

बँकेकडे पुरेसे नसलेले भांडवल आणि भविष्यातून उत्पन्न मिळविण्याची कमी संधी आहे. तसंच ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्याएवढी या बँकेची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे बँकिंग परवाना रद्द केल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पैसे फेडू शकत नाही. आरबीआय व्यतिरिक्त सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे कुलसचिव यांनीही महाराष्ट्रातील ही बँक बंद करून बँकेसाठी अधिकारी नेमण्याचे आदेश जारी केले आहेत.

सध्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आहे. हे बँकिंग नियमन कायदा 1949 च्या तरतुदीनुसार नाही. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. ग्राहकांसाठी सुरू राहणं योग्य नाही. बँकेला व्यवसाय वाढविण्याची परवानगी दिली तर त्याचा परिणाम ग्राहकांवर आणि सामान्य लोकांवर होईल.

महिनाभरापूर्वी आरबीआयने पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला होता. आरबीआयने बँकिंग रेग्यूलेशन कायदा 1949 चे कलम -35A अंतर्गत या बँकेवर निर्बंध आणले होते. याअंतर्गत बँकेतून पैसे काढणे, जमा करणे, कर्ज देणे या व्यवहारांवर निर्बंध आणले होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा