मंडळांच्या प्रवेशद्वाराचा स्थानिकांना त्रास

 Agripada
मंडळांच्या प्रवेशद्वाराचा स्थानिकांना त्रास
मंडळांच्या प्रवेशद्वाराचा स्थानिकांना त्रास
See all

सातरस्ता - कस्तुरबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोत्सवासाठी बांधलेलं प्रवेशद्वार अजूनही तसंच पडलंय. गणेशोत्सव संपून दोन महिने उलटले तरीही या मंडळानं तयार केलेलं पीओपीचे प्रवेशद्वार आणि सजावटीसाठी वापरलेला थर्माकोल, प्लास्टिकचं साहित्य अजूनही तसंच रस्त्यालगत पडलंय. त्यामुळे हे सगळं उचललं गेलेलं का नाही, असा प्रश्न स्थानिक विचारत आहेत. तसंच या मंडळाकडून दंड वसूल करा अशी मागणीही केलीय. याबाबत मंडळाचे कार्यकर्ते संतोष बोदडे यांना विचारलं असता दिवाळीत स्वच्छता मोहीम राबवून साहित्याची विल्हेवाट लावणार असल्याचं सांगितलं.

Loading Comments