पुनर्वसनाच्या मागणीसाठी धडक मोर्चा

 Dalmia Estate
पुनर्वसनाच्या मागणीसाठी धडक मोर्चा
पुनर्वसनाच्या मागणीसाठी धडक मोर्चा
पुनर्वसनाच्या मागणीसाठी धडक मोर्चा
पुनर्वसनाच्या मागणीसाठी धडक मोर्चा
पुनर्वसनाच्या मागणीसाठी धडक मोर्चा
See all

मुलुंड - शंकर टेकडी परिसरातल्या रहिवाशांनी टी वॉर्डच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेत गेटवरच घोषणाबाजी केली. शनिवारी संरक्षण भिंत कोसळून इथल्या स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अजून तिथला मलबा उचलण्यात आला नसून रहिवाशांचे पुनर्वसनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी मंगळवारी सकाळच्या दरम्यान थेट टी वॉर्डच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी स्थानिकांनी एक शिष्टमंडळ स्थापन करून प्रभाग समिती अध्यक्षांची भेट घेतली. तसेच पुनर्वसन आणि तेथील मलबा उचलण्यासाठीचे निवेदन पत्रही दिले. 'मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करणार असा इशारा या शिष्टमंडळाने दिला'. त्यानंतर लवकरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन सहाय्यक आयुक्तांनी दिले.

Loading Comments