क्रिस्टल टॉवर आग: रहिवासी पर्यायी निवासाच्या प्रतिक्षेत


SHARE

परळमधील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली होती. ही आग विझली असली, तरी आगीच्या झळा सोसलेल्या इमारतीतील रहिवाशांना आता स्वत: च्या घरात राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जोपर्यंत घरांची दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी या रहिवाशांनी मुंबई महापालिका आणि प्रशासनाकडे केली आहे.


कारण काय?

क्रिस्टल टॉवरमधील १२ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या घराची अक्षरश: राख-रांगोळी झाली आहे. जळालेलं सामान घरात इस्तत: पडलेलं असल्याने इमारतीतील काही रहिवाशांनी जवळ्याच्या नातेवाईकांकडे राहण्याचा पर्याय निवडला. तर काहींनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.


सध्याची व्यवस्था कुठे?

बुधवारी लागलेल्या आगीनंतर महापालिकेने इमारतीसमोरील श्री. तुलसी हिंदी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली असली, तरी ती तात्पुरती असल्याने जोपर्यंत घराच्या दुरूस्तीचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत पर्यायी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची रहिवाशांची मागणी आहे.

इमारतीमधील रहिवाशांना बुधवारची रात्र जळलेल्या सामानासोबतच काढली. त्यामुळे १२ व्या मजल्यावरील जळून खाक झालेला भाग महापालिकेनं साफ करून लवकरात लवकर मोकळा करून द्यावा. तोपर्यंत आम्हाला राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
- गुणारत्ने सदावर्ते, इमारतीमधील रहिवासीहेही वाचा-

क्रिस्टल टाॅवर आग: सुपारीवाला बिल्डरला २७ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी

Exclusive: सोसायट्यांनो सावधान! अग्निरोधक यंत्रणा नादुरूस्त असल्यास वीज-पाणी कापणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या