चेंबूरमधील निवृत्त पालिका कर्मचारी येणार रस्त्यावर

Chembur
चेंबूरमधील निवृत्त पालिका कर्मचारी येणार रस्त्यावर
चेंबूरमधील निवृत्त पालिका कर्मचारी येणार रस्त्यावर
See all
मुंबई  -  

चेंबूरच्या खारदेवनगर भागातील पालिका वसाहतीमध्ये राहणाऱ्या साडेतीनशे सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कामगारांना पालिकेने घरे रिकामी करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे ऐन पावसाच्या तोंडावर या रहिवाशांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

चेंबूरच्या खारदेवनगरात 1976 साली स्लम इम्प्रूव्हमेंट बोर्डने बेघर रहिवाशांसाठी संक्रमण छावणी बांधल्या होत्या. मात्र या ठिकाणी राहायला कोणीही येत नव्हते. परिणामी ही सर्व घरे पालिकेच्या मालमत्ता विभागाने ताब्यात घेतली. त्यानंतर हीच घरे पालिकेत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक, मुख्य मलनि:सारण खात्यातील कामगार, गटार खाते, रोड रिपेअर, सफाई कामगार यांना राहायला देण्यात आली. त्यानंतर पालिकेने या घरांची एकदाही डागडुजी न केल्याने या घरांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. मात्र तरी देखील पालिका कर्मचाऱ्यांचे कुटुंब याठिकाणी दिवस काढत होते. 

तीन महिन्यांपूर्वी अचानक पालिकेकडून सर्व घरे 3 महिन्यांत रिकामी करा असे सांगण्यात आले. याबाबत रहिवाशांनी याचिका देखील दाखल केली. याच याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या विरोधात निर्णय दिल्याने येत्या 4 ते 5 दिवसांत या रहिवाशांना घरे रिकामी करायची आहेत. पावसाळा तोंडावर असताना आम्ही लहान मुलांना घेऊन जायचं तरी कुठे? असा सवाल स्थानिक रहिवासी महादेव जाधव यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमच्या या गरीब कर्मचाऱ्यांवर दया दाखवत आम्हाला या संकटातून वाचवावे अशी मागणीही रहिवाशांनी केली असून, यासाठी रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.