रामजीनगरच्या रहिवाशांचे उपोषण मागे

  Ghatkopar
  रामजीनगरच्या रहिवाशांचे उपोषण मागे
  मुंबई  -  

  वेळेवर पाण्याचे बिल भरुन देखील पाणी पुरवठा खंडित केल्याने पालिकेच्या एन वॉर्ड ऑफिसमध्ये उपोषणाला बसलेल्या रामजीनगरच्या रहिवाशांनी अखेर शुक्रवारी उपोषण मागे घेतले. पाणी पुरवठा खंडित केल्याने हे रहिवासी गुरुवारी सकाळपासून उपोषणाला बसले होते. रामजीनगर येथील पाण्याच्या टाकीची देखभाल करण्याची जबाबदारी 'शिवनेरी सेवा मंडळा'कडे दिली होती. 'मंडळाने वेळेवर बिल न भरल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले असून, पालिका मंडळाकडून थकीत बिल वसूल करणार असल्याच्या आश्वासनानंतर रहिवाशांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्थानिक नंदा गव्हाणे यांनी दिली.

  पालिका लवकरच रामजीनगर येथील रहिवाशांना मुख्य जलवाहिनीशी जोडणारे नळ देणार असून, खंडित केलेला पाणी पुरवठा पुन्हा सुरू करणार आहे. 

  - राजन प्रभू, सहाय्यक जल अभियंता, एन वॉर्ड

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.