पालिकेच्या कासवगतीमुळे नागरिक संतप्त

 Kurla
पालिकेच्या कासवगतीमुळे नागरिक संतप्त
पालिकेच्या कासवगतीमुळे नागरिक संतप्त
पालिकेच्या कासवगतीमुळे नागरिक संतप्त
पालिकेच्या कासवगतीमुळे नागरिक संतप्त
पालिकेच्या कासवगतीमुळे नागरिक संतप्त
See all

कुर्ला- वॉर्ड ऑफिसमध्ये होणाऱ्या कासवछाप कामांमुळे संतापलेल्या नागरिकांनी कुर्ला एल वॉर्ड ऑफिससमोर गोंधळ घातला. नागरिकांचा आरोप आहे की, नऊ दिवसापासून इथं फारच धीम्या गतीनं काम सुरू आहे. एका कामासाठी आम्हाला अनेकदा खेटे मारावे लागत आहेत.

रहिवासी इस्तियाक अहमद यांचं म्हणणं आहे की, 9 दिवसांपासून पालिका कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही त्यांचं काम झालेलं नाही. पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, सर्व्हर डाउन होत असल्यानं अडचण होते आहे. वॉर्ड अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जास्त भार येत असल्यानं संगणक हँग होतो. पण लवकरच या समस्या सुटतील.

Loading Comments