उड्डणपुलाला रहिवाशांचा विरोध

चुनाभट्टी - राज्य सरकारनं चुनाभट्टीत उड्डाणपूल बनवण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे एव्हरार्डनगर ते बीकेसी प्रवास सुखकर होणार आहे. मात्र आंबेकर सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांचा विचार न करताच या उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरुवातही करण्यात आलीये. त्यामुळे या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांनी याला विरोध केलाय. 45 वर्षांपासून रहिवासी या सोसायटीत राहतात. या सोसायटीला 1986-87 सालात महानगरपालिकेकडून ग्रीनरी सोसायटी म्हणूनही गौरवण्यात आलं होतं. मात्र आता हीच सोयायटी प्रदूषणाच्या विळख्यात अडकणार आहे, असं येथील रहिवासी विजय कोल्हटकर यांनी सांगितलं.

Loading Comments