Advertisement

कुख्यात गुंड माया डोळसचा एन्काऊंटर करणारे निवृत्त IPS ए.ए. खान यांचे निधन

कुख्यात गुंड माया डोळसचा एन्काऊंटर करणारे निवृत्ता आयपीएस अधिकारी ए.ए. खान यांचे निधन झाले.

कुख्यात गुंड माया डोळसचा एन्काऊंटर करणारे निवृत्त IPS ए.ए. खान यांचे निधन
SHARES

कुख्यात गुंड माया डोळसचा एन्काऊंटर करणारे निवृत्ता आयपीएस अधिकारी ए.ए. खान यांचे निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात  शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८१ वर्षांचे होते.

शूटऑऊट एट लोखंडवाला नावाने काही वर्षांपू्र्वी मुंबईच्या गँगवारवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कुख्यात गुंड माया डोळसची जीवनकथा दाखविण्यात आली होती. या सिनेमात विवेक ऑबेरॉयने माया डोळसची भूमिका केली होती. 

१६ नोव्हेंबर १९९१ रोजी लोखंडवाला कॉम्पलेक्समध्ये एक एन्काउंचर घडले होते. या एन्काऊंटरमध्ये माया डोळसचा खात्मा झाला.  पोलिस अधिकारी ए. ए. खान यांनी अधिकाऱ्यांना, कमांडोजना त्यांच्या जागा आखून दिल्या होत्या. आता अॅक्शनची वेळ होती. 

दुसऱ्या मजल्यावर D gang चा माया डोळस आणि त्याचे साथीदार लपले होते, याची माहिती होती. अनेक मर्डर, खंडणीची प्रकरणे त्याच्या नावावर होती. मोस्ट वॉन्डेट माया जवळ पोलिस पोहचले होते. 

या थरारयुद्धात ए.ए.खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, तेथेच मायाचा खात्मा करण्यात आला. चित्रपटात अभिनेता संजय दत्तने ए.ए.खानची भूमिका बजावली होती. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा