Advertisement

तर, मंत्रालयातच आत्मदहन करेन, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा


तर, मंत्रालयातच आत्मदहन करेन, निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा
SHARES

शासकीय निवासस्थानासंबंधी मॅटने दिलेल्या आदेशावर ४ वर्षांपासून कार्यवाही होत नसल्याने त्रस्त सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मोहन बाबुराव तोडकर यांनी मंत्रालयातच आत्मदाह करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या या टोकाच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा गृहविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


'मॅट'नेही घेतली बाजू

मोहन तोडकर 94/3329 कुर्ला (पूर्व) मुंबई येथील शासकीय निवासस्थानी राहतात. हे घर पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुनेच्या नावावर करण्यासाठी तसेच या घराचे भाडे बंद करण्यासंबंधी तोडकर यांनी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता. मात्र पोलीस दलाने तसे करण्यास नकार दिल्यावर तोडकर यांनी 'महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात' (मॅट) धाव घेतली. यासंदर्भातील सुनावणीत 'मॅट'ने तोडकरांच्या बाजूने निकाल दिला.


४ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित

तरीही ४ वर्षांपासून पोलीस दलाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने तोडकरांनी गृहविभागाकडे धाव घेतली आहे. पोलीस दलातील सनदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शिस्तीच्या नावाखाली मानसिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप करत तोडकर यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.



तोडकर यांनी पत्नीसह दिवाळीच्या दिवशी १८ ऑक्टोबरला मंत्रालयात आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदन गृहविभागाला दिले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी अर्जात केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि राज्यपालांनाही विनंती अर्ज करण्यात आला आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा