गोरेगाव एस.व्ही.रोडवर बॅरिकेड्स

 Goregaon
गोरेगाव एस.व्ही.रोडवर बॅरिकेड्स

गोरेगाव -  पश्चिमेला हिंदुस्थान स्टुडिओ ते एम.टी.एन.एल.कार्यालय या रोडवर लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या निधीतून हे लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. वाहतूक कोंडीतून सुटका हा बॅरिकेड्स लावण्यामागचा उद्देश आहे. या रस्त्यावर कुठेही बॅरिकेड्स नव्हते. त्यामुळे कुठूनही यू टर्न घेतला जात होता. त्याचा त्रास अन्य वाहनचालाकांना होत होता. वारंवार मागणी करूनही यावर काही उपाय निघत नव्हता. अखेर ही बॅरिकेड्स लागल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे.

Loading Comments