शाहीर कुंदन कांबळेंच्या कुटुंबियांचे आठवलेंकडून सांत्वन

 Vikhroli
शाहीर कुंदन कांबळेंच्या कुटुंबियांचे आठवलेंकडून सांत्वन
Vikhroli, Mumbai  -  

आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कवी दिवंगत शाहीर कुंदन कांबळे यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. उपेक्षित आणि सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शाहीर कुंदन कांबळे यांचे नुकतेच विक्रोळी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. कुंदन कांबळे यांच्या 5 कन्या आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाला नोकरीला लावण्याचे आश्वासन यावेळी रामदास आठवले यांनी दिले . यावेळी कवी. प्रा. प्रशांत मोरे, रिपाइंचे श्रीकांत भालेराव, माजी नगरसेवक राम तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शाहीर कांबळे यांचे 'शाहीरी मेवा' हे पुस्तक प्रचंड गाजले होते. महाराष्ट्रासह देशभरात त्यांची हिंदी आणि मराठी गीतेही लोकप्रिय ठरली होती.

Loading Comments